नगर येथे यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी "सुगरण" उपक्रमाचा प्रारंभ
नगर : महाराष्ट्र राज्यात बचत गटांना खूप महत्व प्राप्त झाले आहे, आपल्या महिला एकत्रित येवून आपल्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत आहे, बचत गटाच्या माध्यमातून चांगली वस्तू निर्माण होत असून ती ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळाले आहे महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंची ब्रांड निर्माण होण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी यशस्विनी प्रकल्प चालू केला आहे. त्याच माध्यमातून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी "सुगरण" हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. सुगरण उपक्रमांतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी राज्यातील रिलायन्स सुपर स्टोअर मध्ये दर शनिवार, रविवारी स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती नगरसेविका शीतलताई जगताप यांनी दिली
नगर येथील रिलायन्स सुपर स्टोअर मध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांनी उभारलेल्या यशस्विनी प्रकल्प अंतर्गत ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने "सुगरण" या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेविका शीतलताई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्टवादी महिला शहर अध्यक्षा रेश्मा ताई आठरे, सुरेखा कडूस वैशाली गुंड , दिपाली आढाव, नीलम परदेशी, श्रद्धा तनपुरे, भारती बाफना, पूजा पाटील, वैशाली भापकर आदी उपस्थित होते
रेश्मा ताई आठरे म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण सेंटर व रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोर यांच्या संयुक्त विद्यमाने "यशस्विनी प्रकल्प " अंतर्गत बचतगट व वैयक्तिकरित्या तयार केलेल्या उत्पादनाला रिलायन्स सुपर स्टोर मध्ये वस्तू विकण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली, त्यामुळे महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना चांगले मार्केट उपलब्ध झाले आहे या माध्यमातून महिलाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल व आपल्या कुटुंबाला हातभार लागेल असे त्यांनी सांगितले
0 टिप्पण्या