संस्कारशील व मानवतावादी पिढी घडवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्रबोधनातून भक्ती, कर्म, शिक्षणाची व ज्ञानाची शिकवण देणारे महान संत, वारकरी संप्रदायातील आधुनिक विचारांची जनमानसात पेरणी करणारे समाजसुधारक, ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार अर्पण करुण विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी आमदार संग्राम जगताप , शहरजिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, विद्यार्थी अध्यक्ष वैभव ढाकने, संतोष ढाकने, अरविंद शिंदे, जय भगवान महासंघाचे रमेश सानप, राहुल सांगळे, अमित खामकर, adv अभिषेक पालवे, नीलेश बांगरे, तुलसीदास बोडखे, माउली जाधव, सौरभ आंधळे, सतीश गीते, अमर पालवे, भरत गारुडकर विशाल बेलपवार, अक्षय बोरुडे उपस्थित होते .
राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात किर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या किर्तनातही दिसून येई. किर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
0 टिप्पण्या